एल्गार प्रकरणातील फरेरा यांचा जामीनासाठी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एल्गार प्रकरणातील फरेरा
यांचा जामीनासाठी अर्ज
एल्गार प्रकरणातील फरेरा यांचा जामीनासाठी अर्ज

एल्गार प्रकरणातील फरेरा यांचा जामीनासाठी अर्ज

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी अरुण फरेरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज केला आहे. माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून फरेरा ऑगस्ट २०१८ पासून अटकेत आहेत.
एल्गार प्रकरणातील प्रा. सुधा भारद्वाज यांना न्यायालयाने काही दिवसांपूर्वी डिफॉल्ट जामीन मंजूर केला आहे. याच धर्तीवर मलाही जामीन मंजूर होऊ शकतो. कारण दोन्ही प्रकरणात समान परिस्थिती आणि सामायिकता आहे, असा दावा फरेरा यांनी केला आहे. सन २०१८ मध्ये फरेरा आणि अन्य आठ आरोपींना पुणे न्यायालयाने विशेष न्यायालयाची सक्षमता नसताना सुनावणी आणि रिमांड दिला होता. याच मुद्द्यावर भारद्वाज यांना जामीन मंजूर झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे डिफॉल्ट जामीन आम्हाला मंजूर होऊ शकतो, असे फरेरा यांचे म्हणणे आहे. आज न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे याचिकेचा उल्लेख झाला; मात्र त्यांनी याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता अन्य न्यायालयात यावर सुनावणी होईल.
---
मालेगावच्या सुनावणीसही नकार
दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्या. डेरे यांनी यापूर्वी अभियोग पक्षाच्या वतीने काम केले आहे, असे एका आरोपीच्या वतीने निदर्शनास आणण्यात आले. त्यामुळे न्या. डेरे यांनी सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे खटल्याची सुनावणी आता अन्य खंडपीठापुढे होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08240 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..