१३ पुलांवरून मिरवणुकीस मनाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१३ पुलांवरून मिरवणुकीस मनाई
१३ पुलांवरून मिरवणुकीस मनाई

१३ पुलांवरून मिरवणुकीस मनाई

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : आगामी गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईतील धोकादायक उड्डाण पुलांचा आढावा घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार पूल विभागाने मुंबईतील १३ पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले. त्यानुसार या पुलांवरून गणेश विसर्जन मिरवणूक नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच यंदा महापालिनेने कृत्रिम विसर्जन स्थळांच्या संख्येतही घट केली आहे.
महापालिकेने धोकादायक ठरलेल्या १३ पुलांवरून १६ टनांपेक्षा अधिक वजनाची वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या पुलांमध्ये घाटकोपर आरओबी, करी रोड रेल्वे पूल, साने गुरुजी मार्ग चिंचपोकळी रेल्वे पूल, मरिन लाइन्स रेल्वे पूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे पूल, फ्रेंच रेल्वे पूल, चर्नी रोड, केनेडी रेल्वे ब्रीज, फॉकलँड्स रेल्वे ब्रीज ग्रॅंट रोड, बेलासिस सेंट्रल रेल्वे ब्रीज, मुंबई सेंट्रल रेल्वे ब्रीज, स्टील रेल्वे पूल, प्रभादेवी कॅरोळ रेल्वे पुलाचा समावेश आहे.
दरम्यान, पालिकेने यावेळी कृत्रिम विसर्जन स्थळांची संख्याही कमी केली आहे. गतवर्षी पालिकेकडून १७३ कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध केली होती. यंदा ही संख्या ११ ने कमी करत १६२ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच मुंबईत ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळांना मान्यता देण्यात आली आहे.
---
विसर्जनासाठी ऑनलाईन सुविधा
गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने ऑनलाईन स्लॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी https://shreeganeshvisarjan.com या संकेतस्थळावर घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या स्वतंत्र नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पालिकेच्या २४ विभागांमधून कोणतेही विसर्जन स्थळ निवडले जाऊ शकते. निवडलेल्या विसर्जनाचे ठिकाण, तारीख आणि वेळ यासोबतच मोबाईल नंबर टाकल्यावर विसर्जनासाठी स्लॉट दिला जाणार आहे. त्यानुसार गणेशभक्तांना बाप्पाचे विसर्जन करता येणार आहे.
---
मोठ्या गणेशमूर्तींसाठी क्रेन सुविधा
महापालिकेने मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध केली आहे. ही सुविधा मोठ्या गणेशमूर्ती विसर्जन केल्या जाणाऱ्या विसर्जन स्थळांवरच उपलब्ध असेल. त्याबाबतची नियमावली लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.