यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोमवारी महिला कवयित्रींची मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोमवारी महिला कवयित्रींची मैफल
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोमवारी महिला कवयित्रींची मैफल

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोमवारी महिला कवयित्रींची मैफल

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : श्रावणातील रिमझिम बरसणाऱ्या पावसासोबत संवेदनांची शब्दचित्रे निर्माण करणारी खास महिला कवयित्रींची एक सुरेख काव्यमैफल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी (ता. २२) सायंकाळी ४ ला आयोजित करण्यात आली आहे. यातील पहिल्या काव्यरंग सत्रात कवयित्री अनघा गोखले, स्मिता औताडे, नेहा ओक, शिल्पा राणे, माधुरी कुलकर्णी, लता सगणे, कविता भडके, उषा चांदूरकर, पद्मिनी शंकरशेठ, उज्ज्वला लिखते आदी कविता सादर करणार आहेत. या सत्राचे अध्यक्षस्थान अनुराधा नेरुरकर या भूषवतील, तर सूत्रसंचालन जयश्री संगीतराव करणार आहेत. यावेळी लता गुठे, विजयालक्ष्मी अणे, स्वाती घोगरे आदींचा सन्मान होणार आहे. काव्यरंगच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान गौरी कुलकर्णी भूषवतील. यावेळी कवयित्री फरझाना इकबाल, सुवर्णा जाधव, हेमांगी नेरकर, वृषाली शिंदे, लता गुठे, विद्या प्रभू आदी सहभागी होतील; तर सूत्रसंचालन ज्योती कपिले करतील, अशी माहिती महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या रेखा नार्वेकर यांनी दिली.