खड्ड्यांविरोधातील याचिकांसाठी विशेष खंडपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यांविरोधातील याचिकांसाठी विशेष खंडपीठ
खड्ड्यांविरोधातील याचिकांसाठी विशेष खंडपीठ

खड्ड्यांविरोधातील याचिकांसाठी विशेष खंडपीठ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात वाढत असून चालक आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याबाबत न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल होतात. दिवसेंदिवस राज्यातील खड्ड्यांची समस्या गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आत यासंबंधित याचिकांसाठी विशेष खंडपीठ नेमणार आहे, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाने खड्डेदुरुस्तीबाबत एप्रिल २०१८ मध्ये निर्देश दिले होते. यामध्ये तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे, मॅनहोल बंदिस्त करणे, रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाबाबत सविस्तर माहिती फलक लावणे आदी निर्देश आहेत. हे आदेश सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक आहेत, परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटूनही राज्य सरकारने याची कोणतीही पूर्तता केली नाही, असे आज याचिकादारांच्या वतीने ॲड. मनोज शिरसाठ यांनी सांगितले. मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.
नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध न झाल्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांचा भंग होत आहे. याबाबत न्यायालयाने जलदगतीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. खंडपीठाने याची दखल घेतली असून स्वतंत्र खंडपीठ नेमण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.