डॉ. नितीन आरेकर यांच्या पुस्तकांचे बुधवारी प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. नितीन आरेकर यांच्या पुस्तकांचे बुधवारी प्रकाशन
डॉ. नितीन आरेकर यांच्या पुस्तकांचे बुधवारी प्रकाशन

डॉ. नितीन आरेकर यांच्या पुस्तकांचे बुधवारी प्रकाशन

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : डिंपल पब्लिकेशन प्रकाशित केलेल्या डॉ. नितीन आरेकर लिखित ‘शब्दांकित’ आणि ‘माझं क्षितिज’ पुस्तकांचे प्रकाशन बुधवारी (ता. २२) मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर-मिनी थिएटरमध्ये सायंकाळी ५ वाजता होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अरुण शेवते, डॉ. समिरा गुजर-जोशी करणार आहेत; तर या वेळी पर्पल इव्हेंटसच्या प्रियांका साठे आणि संतोष जोशी, अशोक मुळे यांची उपस्थिती असणार आहे.