‘मेट्रो ३’वरील रस्ता घेणार मोकळा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मेट्रो ३’वरील रस्ता घेणार मोकळा श्वास
‘मेट्रो ३’वरील रस्ता घेणार मोकळा श्वास

‘मेट्रो ३’वरील रस्ता घेणार मोकळा श्वास

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गाच्या कामासाठी शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेले बॅरिकेड्स ऑक्टोबरपासून हटवण्यास सुरुवात होणार आहे. भूमिगत मेट्रोसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावले असल्याने गेल्या सहा वर्षांपासून मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागत होते; मात्र त्यातून लवकरच मुंबईकरांची सुटका होणार आहे.
राज्य सरकारने मेट्रो ३ च्या आराखड्याला २०११ मध्ये मंजुरी दिली. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर २०१६ मध्ये प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरू झाले. या मार्गाच्या कामासाठी एमएमआरसीने मुंबई शहर आणि उपनगरातील विविध रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले. तसेच अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद केले. यामुळे चाकरमान्यांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या मेट्रो मार्गावरील बोगद्यांचे ९८.६ टक्के काम पूर्ण झाले असून भूमिगत स्थानकांचे सुमारे ८२.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेड्स हटवण्यास ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात येणार असून ते फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरसीच्या वतीने देण्यात आली.