रिक्त पदे भरण्यासाठी बुक्टो आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्त पदे भरण्यासाठी बुक्टो आक्रमक
रिक्त पदे भरण्यासाठी बुक्टो आक्रमक

रिक्त पदे भरण्यासाठी बुक्टो आक्रमक

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि राज्य सरकारकडूनही प्राध्यापकांच्या रिक्त जागा, त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी कायमच दिरंगाई केली जाते. याच्या निषेधार्थ ‘बुक्टो’ या प्राध्यापक संघटनेकडून सोमवारी (ता. २२) दुपारी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात आंदोलन छेडले जाणार आहे. यात प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती ‘बुक्टो’चे अध्यक्ष डॉ. जी. बी. राजे यांनी दिली.
अनुदानित आणि विनाअनुदानित आदी सर्वच वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने त्याचे शैक्षणिक गुणवत्तेवर मोठे परिणाम होत आहेत. एकीकडे रिक्त जागा भरल्या जात नाहीत आणि दुसरीकडे नवीन खासगी महाविद्यालयांना मान्यता दिली जात आहे. त्यासाठी बृहत्आराखडाही विचारात घेतला जात नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणारी असंख्य अनुदानित महाविद्यालये आणि अनुदानित शिक्षण व्यवस्थाही धोक्यात आल्याने आम्ही आंदोलन करत असल्याचे बुक्टोचे डॉ. जी. राजे यांनी सांगितले.

या आहेत मागण्या
यूजीसी नियमावली २०१८ मधील असंविधानिक बदल रद्द करा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे समान काम समान वेतनाची अंमलबजावणी प्राध्यापकांच्या संदर्भात लागू करा, करिअर ॲडव्हान्समेंट स्कीममध्ये अनेक त्रुटी दाखवून त्यासाठीची वसुली राज्यभरातील प्राध्यापकांकडून केली जात असून, ती तात्काळ थांबविण्यात यावी, एमफिल पात्र प्राध्यापकांनाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, रिक्त पदांवर पात्र कंत्राटी, तासिका तत्त्वावर शिक्षकांना नियमित वेतनावर सामावून घ्यावे, जुन्या पेन्शन योजनेसोबत पात्र कंत्राटी, सीएचबी शिक्षकांना रिक्त पदांवर सामावून घेणे आदी मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार असल्याचे बुक्टोच्या महासचिव डॉ. मधू परांजपे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08268 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..