मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’साठी सोमवारपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’साठी सोमवारपर्यंत मुदतवाढ
मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’साठी सोमवारपर्यंत मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’साठी सोमवारपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By

मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’साठी सोमवारपर्यंत मुदतवाढ
मुंबई, ता. २१ : मुंबई विद्यापीठामार्फत पीएच.डी. या पदवीसाठी घेण्यात येणाऱ्या पेट परीक्षेला अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील आठवड्यात काही दिवस शासकीय सुट्ट्या आल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपले ऑनलाईन अर्ज भरता आले नाहीत, त्यामुळे ही मुदतवाढ सोमवारी, २२ ऑगस्टपर्यंत देण्यात आली असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
पेट परीक्षेसाठी आतापर्यंत विविध शाखांच्या तब्बल चार हजार ५७६ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरून पूर्ण केले आहेत. यामध्ये एक हजार ९५५ विद्यार्थी; तर दोन हजार ६२१ विद्यार्थिनींचा समावेश आहे. विशेष म्हणजे वाणिज्य आणि व्यवस्थापनातील पेटसाठी केवळ ७५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे; तर दुसरीकडे सर्वाधिक अर्ज विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पेटसाठी आलेले आहेत. ह्युमॅनिटीससाठी एक हजार १७३; तर आंतरशाखांसाठी ६२१ अर्ज भरून पूर्ण झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी त्यासाठीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. त्यातच काही विद्यार्थ्यांचे शुल्क भरणेही बाकी राहिल्याने विद्यापीठाने ही मुदतवाढ दिली असून यादरम्यान विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरावेत, असे आवाहन विद्यापीठाकडून कण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08281 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..