आगप्रतिबंधक नियमावलीसंबंधी समितीची अखेर स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगप्रतिबंधक नियमावलीसंबंधी समितीची अखेर स्थापना
आगप्रतिबंधक नियमावलीसंबंधी समितीची अखेर स्थापना

आगप्रतिबंधक नियमावलीसंबंधी समितीची अखेर स्थापना

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : उत्तुंग इमारतींमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा नियमावली तयार करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या समितीची स्थापना अखेर राज्य सरकारने केली आहे. समितीने दोन महिन्यांत आपला प्राथमिक अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
राज्य सरकारने अग्निसुरक्षा नियमांची शिफारस करण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये नोरा शेंडे, संदीप किसोरे आणि मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाचे मुख्य अभियंता सदस्य म्हणून आहेत. १८ तारखेला याबाबत शासकीय निर्णय जारी करण्यात आला. तसेच समितीची कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी आज मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे ही माहिती दिली. याचिकादारांनी तीन आठवड्यांत त्यांच्या सूचना समितीकडे दाखल कराव्यात, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. समितीने दोन महिन्यांत आपला प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयाने चालू वर्षी एप्रिलमध्ये एका आदेशाद्वारे राज्य सरकारला उंच इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा निर्माण करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचे आणि नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते; मात्र यावर कार्यवाही न केल्याने समाजसेविका ॲड. आभा सिंह यांनी ॲड. आदित्य प्रताप सिंह यांच्यामार्फत यासंदर्भात जनहित याचिका केली आहे. इमारतींमध्ये लागणाऱ्या आगी आणि होणारी जीवितहानी यावर याचिकेत चिंता व्यक्त केली आहे.
...
अधिसूचना २००९ मध्ये
राज्य सरकारने समिती स्थापन न केल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांना १९ ऑगस्टपर्यंतचा अंतिम अवधी मंजूर केला होता. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने याची दखल घेऊन सन २००९ मध्ये अधिसूचना जारी केली होती; मात्र समिती आता न्यायालयाने खडे बोल सुनावल्यावर नियुक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08284 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..