वाईन विक्री धोरणाचा निर्णय प्रलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाईन विक्री धोरणाचा निर्णय प्रलंबित
वाईन विक्री धोरणाचा निर्णय प्रलंबित

वाईन विक्री धोरणाचा निर्णय प्रलंबित

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्यातल्या द्राक्ष उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या जात असलेल्या वार्इनचा खप वाढावा आणि शासनाचा महसूल वाढवा म्हणून महाविकास आघाडी सरकारने वाईन धोरणाची घोषणा केली होती; मात्र तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने वाईन धोरणावर सडकून टीका केली होती. दरम्यान, २९ जूनपर्यंत नागरिकांच्या धोरणावर हरकती मागण्यात आल्या होत्या. दरम्यान, नागरिकांच्या हरकती नोंदवूनही अद्याप वाईन धोरणावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या वाईन धोरणाला मान्यता मिळाल्यास वाईनला सुपर मार्केटमध्ये मांडणी किंवा शेल्फदार सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री परवाना देऊन वार्इनची विक्री करता येणार होती. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला आपल्या हरकती नोंदवल्या असून, ज्यामध्ये एप्रिल ते जून या तीन महिन्यांत सुमारे ११ हजारपेक्षा जास्त हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. धोरणाच्या बाजूने आणि धोरणाच्या विरोधातील हरकतींची संख्या बघता त्यासंबंधित प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे.
मात्र तत्कालीन सरकारमध्ये वाईन धोरणावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आता सत्तेत बसून, वाईन धोरणावर निर्णय घेताना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. विरोध किंवा समर्थन करताना सत्ताधाऱ्यांवर विद्यमान विरोधकसुद्धा त्याच पद्धतीने विरोध करण्याची शक्यता असल्याने कदाचित वाईन धोरणावरील निर्णय तसाच प्रलंबित राहण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08296 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..