लायसन्स नूतनीकरणासाठी डॉक्टरांच्या दाखल्याची अट रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लायसन्स नूतनीकरणासाठी डॉक्टरांच्या दाखल्याची अट रद्द करा
लायसन्स नूतनीकरणासाठी डॉक्टरांच्या दाखल्याची अट रद्द करा

लायसन्स नूतनीकरणासाठी डॉक्टरांच्या दाखल्याची अट रद्द करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : परिवहन विभागाने लायसन्स नूतनीकरणासाठी चालकांच्या फिटनेस तपासणी प्रमाणपत्रासाठी डॉक्टरांना मान्यता दिली आहे. दिवसभरात डॉक्टरांना प्रत्येकी २५ प्रमाणपत्रे देण्याची परवानगी देण्यात आली असून, त्यामुळे वाहनचालकांना अनेक वेळा वेटिंगमध्ये राहावे लागते आहे. परिणामी वाहतूकदारांचे काम ठप्प होत आहे. त्यामुळे परिवहन विभागाने प्रत्येक आरटीओ कार्यालयाचा अंतर्गत अधिकृत नोंदणीकृत डॉक्टरांची संख्या वाढवावी किंवा डॉक्टरांना तपासणी प्रमाणपत्र देण्याच्या मर्यादेची अट रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने परिवहन आयुक्तांकडे केली आहे.
परिवहन संवर्गातील वाहनचालकांना दर ५ वर्षांनी लायसन्स नूतनीकरण व खासगी वाहनधारकांना त्यांचे लायसन्स ४० वर्षानंतर नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये नोंदणीकृत डॉक्टरांची निवड करण्यात आली आहे. याच डॉक्टरांमार्फत फिटनेस दाखला घेऊन ऑनलाईन सबमिट करावा लागतो. डॉक्टरांना एका दिवशी फक्त २५ लायसन्स नूतनीकरणासाठी फिटनेस दाखला देण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा जास्त दाखले देता येत नसल्याने चालकांना दुसऱ्या दिवसाची वाट बघावी लागत आहे.
परिवहन विभागाच्या ऑनलाईन धोरणात फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी अत्यंत कमी डॉक्टरांनी प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे फार कमी डॉक्टरांची यासाठी नोंदणी झाली आहे. यामुळे नूतनीकरण अर्जाची संख्या जास्त व डॉक्टर्स कमी यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08299 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..