जीएसबी गणपतीबाप्पाचा ३१६ कोटींचा विमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीएसबी गणपतीबाप्पाचा ३१६ कोटींचा विमा
जीएसबी गणपतीबाप्पाचा ३१६ कोटींचा विमा

जीएसबी गणपतीबाप्पाचा ३१६ कोटींचा विमा

sakal_logo
By

जीएसबी गणपतीचा ३१६ कोटींचा विमा
दागिने, सजावट, कर्मचारी, सुरक्षारक्षकांसाठी खबरदारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : जगप्रसिद्ध आणि देशातील सर्वांत श्रीमंत गणपती असा नावलौकिक असलेला किंग सर्कल येथील जीएसबी (गौड सारस्वत ब्राह्मण) सेवा मंडळ अर्थात नवसाला पावणारा विश्वाचा राजा या गणपतीचा या वर्षी मंडळाकडून ३१६.४० कोटींचा विमा काढण्यात आला आहे. विविध प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण म्हणून दागिने, सजावट, कर्मचारी, सुरक्षारक्षक यांचा विमा काढून या वर्षीही मंडळाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
मंडळाने विविध प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी ३१.९७ कोटीचा विमा काढण्यात आला आहे. यामध्ये सोने, चांदी आणि अन्य दागिन्यांचा समावेश आहे. शिवाय स्वयंसेवक, आचारी, भाविक, चप्पल स्टॉल कर्मचारी, वॉलेट पार्किंग कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांचा २६३ कोटींचा अपघात विमा काढण्यात आला आहे. तसेच अग्निसुरक्षा आणि भूकंपासारख्या विशेष धोका सुरक्षा संदर्भात एक कोटीचा विमा काढला आहे. यामध्ये फर्निचर, कम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेरा स्कॅनर, काचेचे सामान, फळ भाज्या यांचा समावेश आहे. सामाजिक दायित्व या अंतर्गत मंडप, स्टेडियम आणि भाविक यांचा २० कोटींचा विमा काढण्यात आला आहे.
जीएसबी गणपतीचा प्रथम दर्शन सोहळा म्हणजेच विराट दर्शन हे २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. त्यानंतर ३१ ते ४ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ऋग्वेदाच्या परंपरा आणि विधींचे पालन करून २४ तास विधी करणारे जीएसबी हे शहरातील एकमेव गणेशोत्सव मंडळ आहे. या गणपतीची ख्याती दिवसेंदिवस वाढत असून भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मूर्तीला ९० किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने, ३०० किलोपेक्षा जास्त चांदीचे दागिने आणि मौल्यवान खड्याने मढवण्यात येते. दरवर्षी २० हजारपेक्षा अधिक लोक अन्नदान सेवा म्हणजे प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. महागणपतीच्या मंडपामध्ये दरवर्षी ८० हजारपेक्षा अधिक भाविक पूजा करतात.

कोट
पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणपतीची मूर्ती ही शाडूच्या माती आणि गवतापासून बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीची मूर्ती ही पूर्णपणे पर्यावरणपूरक तयार करण्यात आली आहे. मूर्ती घडवताना पर्यावरणाची काळजी घेण्यात आली असून मूर्ती रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे.
अमित पै, मंडळाचे प्रवक्ते

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08301 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..