गणेशोत्सवापूर्वी मिळणार शिक्षकांना वेतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवापूर्वी मिळणार शिक्षकांना वेतन
गणेशोत्सवापूर्वी मिळणार शिक्षकांना वेतन

गणेशोत्सवापूर्वी मिळणार शिक्षकांना वेतन

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणेशोत्सवापूर्वी मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. आज विधानभवन परिसरात महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्याला आदेश दिले आहेत.
परिषदेने आपल्या निवेदनात मागील दोन वर्षामत कोविड महामारीमुळे कोकणासह इतर भागांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जाऊ शकले नव्हते. या वर्षीचा गणेशोत्सव ३१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. कोकणासह राज्यातील बहुतांश भागांतील लोक आपल्या मूळ गावी हा सण साजरा करतात. या सणाची पूर्वतयारी करता यावी आणि सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी या महिन्याचे वेतन २५ ऑगस्टपूर्वी करण्याची मागणी केली होती. तसेच यासंदर्भात शिक्षक आमदार नागो गाणार, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही या महिन्याचे वेतन लवकर होण्यासाठी पाठपुरावा केला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08329 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..