मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात डेंग्यूच्या आळ्या सापडल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात डेंग्यूच्या आळ्या सापडल्या
मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात डेंग्यूच्या आळ्या सापडल्या

मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात डेंग्यूच्या आळ्या सापडल्या

sakal_logo
By

विद्यापीठाच्या संकुलात डेंगीच्या अळ्या
मुंबई, ता. २४ : मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील काही भागांत डेंगीच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे परिसरात खबरदारी म्हणून महापालिका आरोग्य विभागाकडून येथील अधिकारी निवासात राहणाऱ्या रहिवाशांची रक्तचाचणी केली जात आहे.
पालिका आरोग्य विभागाकडून कालिना परिसरात नुकतीच तपासणी करण्यात आली. त्या वेळी अनेक ठिकाणी डेंगीच्या अळ्या सापडल्या. विभागातील प्रत्येक भागाची एक यादी जाहीर करण्यात आली असून त्यात मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलाच्या आवारातील काही भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात हिवताप निर्मूलनासाठी संयुक्तरीत्या रक्त संकलन केले जात असल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठाच्या कालिना संकुलात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. महापालिका आरोग्य अधिकारी काळजी घेत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08337 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..