बेस्टची दिव्यांगांकरिता घरपोच कार्ड सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेस्टची दिव्यांगांकरिता घरपोच कार्ड सेवा
बेस्टची दिव्यांगांकरिता घरपोच कार्ड सेवा

बेस्टची दिव्यांगांकरिता घरपोच कार्ड सेवा

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : डिजिटायझेशन प्रक्रियेद्वारे डिजिटल तिकीट पद्धतीस जास्तीत जास्त चालना देण्याच्या हेतूने बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट चलो अॅप’ आणि ‘स्मार्ट कार्ड बस पास’ योजना सुरू केल्या आहेत. आता बेस्ट उपक्रमाने दिव्यांग व्यक्तींसाठी जुने सवलतीचे आणि कागदी ओळखपत्र बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विनंतीवरून घरपोच कार्ड पोचवण्यात येणार आहे.

सर्व विशेष श्रेणीतील सवलतींसाठी प्रवाशांनी ‘बेस्ट चलो अॅप’ डाऊनलोड करून बस पासच्या मान्यतेकरिता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत; परंतु त्यांना स्मार्ट कार्ड हवे आहे त्यांच्यासाठी बेस्टने ते घरपोच पोहोचविण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी कॉल सेंटरकडून विशेष सवलतीच्या पासधारकांना कॉल केला जाणार आहे. स्मार्ट कार्ड घेण्यास इच्छुक असलेल्यांच्या पत्त्यावर कुरिअरद्वारे कार्ड पोहचवले जाईल. बेस्टचे कॉल सेंटर २४ बाय ७ कार्यान्वित रहाणार असून त्याचा क्रमांक १८०० २२७५५० (टोल फ्री) आणि ०२२ - २४१९०११७ असा आहे.
१५ सप्टेंबर २०२२ पासून जुने बस पास रद्द केले जाणार आहेत. त्यामुळे त्याचा वापर अवैध मानला जाईल. त्यामुळे आपले कार्ड लवकरात लवकर बदलून घेण्याचे आवाहन बेस्टने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08339 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..