मुंबई : शर्मा-वाझे भेट देशमुखांच्या दबावातून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradip Sharma sachin waze anil deshmukh mumbai high court
शर्मा-वाझे भेट देशमुखांच्या दबावातून

मुंबई : शर्मा-वाझे भेट देशमुखांच्या दबावातून...

मुंबई : मनसुख हिरेनच्या हत्येपूर्वी काही दिवस आधी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला भेटला होता; मात्र ही भेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून खंडणी वसुलीच्या दबावाबाबत होती, असा दावा शर्माच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. शर्माला एनआयएने हिरेनच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून अटक केली आहे. शर्माने उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका केली आहे. आज न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे ॲड. आबाद पोंडा यांनी शर्माच्या वतीने बाजू मांडली. दरम्यान, या याचिकेवर पुढील सुनावणी ७ सप्टेंबरला होणार आहे.

एनआयएच्या दाव्यानुसार २८ फेब्रुवारी २०२१ ला रात्री आठच्या सुमारास शर्मा मलबार हिल पोलिस ठाण्यात वाझेला भेटायला गेला. तिथून दोघे वरळीमध्ये आले, जिथे हत्येचा कट आखला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहला भेटायला गेला होता. पोंडा यांनी या भेटीबद्दल न्यायालयात कबुली दिली आहे; मात्र देशमुख यांच्याकडून वाझेवर खंडणीवसुलीसाठी दबाव आणला जात होता आणि शर्मा वरिष्ठ पोलिस असल्यामुळे त्याच्याशी बोलण्यासाठी गेले होते. हिरेनच्या हत्येच्या कटाचा याच्याशी संबंध नाही, असे या वेळी त्यांनी सांगितले.

एनआयएने या युक्तिवादाला विरोध केला. ही बाजू कुठेही आलेली नाही, असे ॲड. संदेश पाटील यांनी सांगितले. न्यायालयानेदेखील हा युक्तिवाद आरोपीचा असल्याचे स्पष्ट केले. एनआयएच्या वतीने हल्लेखोर आणि शर्माच्या फोन कॉल्सची माहिती सादर करण्यात आली आहे. तसेच जेव्हा वाझे आणि शर्मा भेटले तेव्हा हिरेनदेखील तिथे आला होता, असे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08341 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..