गर्भवतीप्रकरणी अनपेक्षित प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्भवतीप्रकरणी अनपेक्षित प्रतिक्रिया
गर्भवतीप्रकरणी अनपेक्षित प्रतिक्रिया

गर्भवतीप्रकरणी अनपेक्षित प्रतिक्रिया

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : मैत्रिणीच्या गर्भवती असल्याच्या मेसेजला मित्राने अनपेक्षित किंवा उदासीन प्रतिक्रिया देणे, हे आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी पुरेसे सबळ कारण असू शकत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच या प्रकरणात २० वर्षांच्या आरोपीला सशर्त जामीनही मंजूर केला आहे.
मागील वर्षी मार्चमध्ये ठाण्यात एका १६ वर्षीय मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पीडितेने तिच्या मित्राला व्हॉट्‍सॲपवर एक मेसेज पाठवला होता. मी बहुतेक गर्भवती आहे, असे या मेसेजमध्ये लिहिले होते; मात्र यावर मित्राची अनपेक्षित प्रतिक्रिया आल्यामुळे नाराज होऊन तिने आत्महत्या केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला. आरोपीने न्यायालयात जामिनावर सुटण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर न्या. भारती डांग्रे यांच्यापुढे सुनावणी झाली.
मृत तरुणीच्या शवविच्छेदन अहवालात असे स्पष्ट आहे, की ती गर्भवती नव्हती. त्यामुळे आत्महत्येचे हे कारण अपूर्ण आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पौक्सोसह भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. व्हॉट्सॲपवर मित्राचा अनपेक्षित मेसेज पाहून ती अस्वस्थ झाली आणि तिने आत्महत्या केली, असे पोलिसांनी म्हटले आहे.

न्यायालयाचे निरीक्षण
तरुण-तरुणीमधील व्हॉट्‍सॲप चॅटवरून हे सिद्ध होते, की ते एकमेकांच्या खूप जवळचे मित्र होते; पण त्याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे दर्शविणारा सबळ पुरावा हवा. आरोपीचे वय लहान आहे, तपास पूर्ण झाल्यामुळे त्याला कारागृहात ठेवण्यात हशील नाही, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आणि आरोपीला २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08342 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..