भायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल
भायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल

भायखळ्यात ‘केबल स्टे’ पूल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : भायखळा रेल्वे स्थानकाबाहेरील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल जीर्ण झाल्याने तो पाडून त्या जागी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. सी-लिंकच्या धर्तीवर ‘केबल स्टे’ तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल उभारण्यात येत असून मुंबईतील हा दुसरा पूल ठरणार आहे. नवीन पुलाच्या उभारणीसाठी जागेची अडचण असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूल उभारण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतल्याची माहिती उपमुख्य अभियंता संजय इंगळे यांनी दिली.
भायखळ्यातील ब्रिटिशकालीन पूल साधारणतः सव्वाशे वर्षे जुना आहे. दगड आणि पोलादी गर्डरचा वापर करून हा पूल उभारण्यात आला होता. हा पूल मध्य रेल्वेच्या क्षेत्रात आहे. तो जुना आणि धोकादायक असला तरी रेल्वेकडून त्याची डागडुजी करण्यात येत आहे. सध्या पुलाच्या ‘रिगर्डनिंग’चे काम सुरू आहे. पुलावरून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत हा पूल अपुरा पडत असल्याने त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
भायखळा पुलाच्या आसपास अनेक जुनी बांधकामे आणि इमारती आहेत. त्यामुळे पुलाच्या बांधकामाचे खांब उभारण्यासाठीही जागा शिल्लक नाही. पुलाच्या बांधकामासाठी अधिक जागेचा वापर करता येणार नाही. त्यामुळे या पुलाचे बांधकाम ‘केबल स्टे’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरून वरळी सी-लिंक उभारण्यात आला आहे.

पुलावर दृष्टिक्षेप
१) भायखळा पूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. वाहतुकीसाठी बंद करून त्याचे काम करता येणार नाही. त्यामुळे पालिकेच्या पूल विभागाने जुना पूल सुरू ठेवून नवीन पुलाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
२) सहा महिन्यांपूर्वीच नवीन पुलाचे काम सुरू झाले असून चार खांब उभारले आहेत. महारेलच्या मदतीने पुलाची उभारणी करण्यात येत असून, त्याची लांबी ३०० मीटर आहे. २०२४ च्या अखेरीस या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी पालिका २५० कोटी रुपये खर्च करणार आहे.

पुलाच्या खाली ६-७ व्यावसायिक गाळे आहेत. शिवाय त्याच्या कडेला जुनी मस्जिददेखील आहे. मस्जिदला बाधा येणार नाही, अशा प्रकारे नवीन पुलाचे डिझाईन तयार केले असून व्यावसायिक गळ्यांचे मात्र पुनर्वसन केले जाईल.
- संजय इंगळे, उपप्रमुख अभियंता, पूल विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08349 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..