२३ नवीन महाविद्यालयांना मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२३ नवीन महाविद्यालयांना मान्यता
२३ नवीन महाविद्यालयांना मान्यता

२३ नवीन महाविद्यालयांना मान्यता

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत इरादा पत्र प्राप्त झालेल्या नवीन २३ महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली. त्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला. जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत ३० नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे महिनाभरात विद्यापीठाकडून आतापर्यंत एकूण ५३ नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली असून, ही सर्व महाविद्यालये खासगी तत्त्वावरील आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक ऑनलाईन पार पडली. बैठकीच्या सुरुवातीलाच युवा सेनेच्या सदस्यांनी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनाही बैठक ऑफलाईन का घेतली नाही, या मुद्द्यावरून धारेवर धरले. त्यामुळे बैठकीत मोठी खडाजंगी झाली. कुलगुरू विद्यापीठाच्या अनेक हिताच्या विषयावर उत्तर न देता चालढकल करत असून त्यासाठी आपण या बैठकीत अनेक विषय मांडून त्यांना जाब विचारल्याचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.
विद्यापीठाकडून २८ जुलैला व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या बैठकीत ३० नवीन महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील अनेक महाविद्यालये विधी शाखेची होती. विद्यापीठाचा बृहत् आराखडा लक्षात न घेता आणि स्थानिक स्तरावर परिस्थिती लक्षात न घेता त्यांना मान्यता दिली जात असल्याचा आरोप प्राध्यापक संघटनेने केला होता.

आक्षेप घेण्याची शक्यता
दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने विद्यापीठ सुधारणा विधेयक आणून मान्यता देण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने अनेक संस्थांनी तातडीने मान्यतेसाठी प्रस्ताव आणले आहेत. त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी असू शकतात; मात्र विद्यापीठाने आज घाईघाईने नवीन २३ महाविद्यालयांना मंजुरी दिल्याने येत्या काळात त्यावर जोरदार आक्षेप घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08361 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..