अवघ्या पाच दिवसात मूळपदावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या पाच दिवसात मूळपदावर
अवघ्या पाच दिवसात मूळपदावर

अवघ्या पाच दिवसात मूळपदावर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मुंबई महापालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांची घनकचरा व्यवस्थापन विभागातून परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली. यानंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये त्यांची पुन्हा मूळ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच वेळी दोन्ही ठिकाणाहून चंदा जाधव यांना पदापासूनही दूर केल्याने त्या पद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई पालिकेच्या सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी असलेल्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांची परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी बदली केली; तर परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी सोपवली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08362 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..