सीईटी सेलकडून पुन्हा मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीईटी सेलकडून पुन्हा मुदतवाढ
सीईटी सेलकडून पुन्हा मुदतवाढ

सीईटी सेलकडून पुन्हा मुदतवाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे इंटरनेटचे नेटवर्क मिळाले नाही. मुंबईसह इतर काही ठिकाणी परीक्षेच्या कालावधीतच सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्याना एमएचटी सीईटी परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी उद्या (ता. २५) सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही नोंदणी २४ ऑगस्टला ५ वाजेपर्यंत देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही अनेक विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहिल्याने यासाठी आज विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विषय उपस्थित केला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08364 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..