इमारतींच्या उंचीबाबत निर्बंध शिथिल केले का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इमारतींच्या उंचीबाबत
निर्बंध शिथिल केले का?
इमारतींच्या उंचीबाबत निर्बंध शिथिल केले का?

इमारतींच्या उंचीबाबत निर्बंध शिथिल केले का?

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : नवी मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींच्या उंचीवरील निर्बंध शिथिल केले आहेत का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय विमानतळ प्राधिकरणला केला. वकील यशवंत शेणॉय यांनी केलेल्या जनहित याचिकेवर आज मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
विमानतळ परिसरात बांधल्या जाणाऱ्या अतिउंच इमारतींमुळे विमानांच्या उड्डाणाला धोका निर्माण होत आहे, असे याचिकेत निदर्शनास आणले आहे. मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींचा प्रश्न बिकट झालेला आहे. त्यातच आता प्राधिकरणाने नवी मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींवर उंचीचे निर्बंध शिथिल केले आहेत. यापूर्वी ही मर्यादा ५५.१ मीटर होती, आता ही मर्यादा १६० मीटरपर्यंत करण्यात आल्याचे याचिकादाराकडून सांगण्यात आले. सिडकोने ३० जुलैला काढलेल्या एका परिपत्रकाचा हवाला यामध्ये देण्यात आला. यामध्ये केंद्र सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचाही उल्लेख केला आहे. संबंधित माहिती प्रतिज्ञापत्रात दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश प्राधिकरणाला दिले आहेत. आतापर्यंत किती बांधकाम व्यावसायिकांना ‘एनओसी’ दिली, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला आहे. पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08373 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..