एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना अंशतः दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना अंशतः दिलासा
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना अंशतः दिलासा

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना अंशतः दिलासा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : कलिना कॅम्पसमधील एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सदनिका रिकाम्या करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज अंशतः दिलासा दिला. जागा रिकामी न करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी न्यायालयाने अमान्य केली असली, तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २४ सप्टेंबरपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले आहेत. मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आज या याचिका नामंजूर केल्या.
ऐन पावसाळ्यात कलिना कॅम्पसमधील एअर इंडियाच्या १६०० कर्मचाऱ्यांना सदनिका रिकाम्या करण्याचे आदेश देणाऱ्या एअर इंडियाविरोधात कर्मचारी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. कलिना कॅम्पसमधील घरे रिकामी करण्यासाठी एअर इंडियाने मे महिन्यात नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्यांना २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. तसेच जर जागा रिकामी केली नाही, तर भाड्यासह १५ लाख रुपये दंड देण्याची नोटीस बजावली होती. नोटीसविरोधात एव्हिएशन इंडस्ट्री एम्प्लॉइज गिल्ड, एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज युनियन आणि ऑल इंडिया सर्व्हिस इंजिनिअर्स असोसिएशन या तीन संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
एअर इंडियाच्या वतीने खंडपीठाला माहिती देताना सांगण्यात आले होते, की या कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घरे रिकामी करायला हवीत. न्यायालयाने याचिकांवर आज निकाल जाहीर केला. कर्मचाऱ्यांना औद्योगिक कामगार लवादाकडे दाद मागण्याचा पर्याय खंडपीठाने खुला ठेवला आहे. तसेच सध्या गणेशोत्सव सुरू होत असल्यामुळे तूर्तास ही सक्तीची कारवाई एअर इंडियाने २४ सप्टेंबरपर्यंत करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08379 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..