मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात जबाब फिरवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात जबाब फिरवला
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात जबाब फिरवला

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात जबाब फिरवला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी प्रसाद पुरोहितच्या संबंधित साक्षीदाराने आज विशेष न्यायालयात जबाब फिरवला. यामुळे त्याला न्यायालयाने फितूर घोषित केले. आतापर्यंत २५ साक्षीदार या खटल्यात फितूर झाले आहेत.
पुरोहितच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या लष्करी अधिकाऱ्याची साक्ष आज न्यायालयात घेण्यात आली. साक्षीदाराने विशेष न्या. ए. के. लाहोटी यांच्यापुढे आरोपी पुरोहितला ओळखले, मात्र एटीएसने या प्रकरणात माझी जबानी कधीही नोंदवून घेतली नाही असा जबाब दिला. यानंतर न्यायालयाने त्याला फितूर घोषित केले. एटीएसच्या दाव्यानुसार त्यांनी या साक्षीदाराचा तीन पानी जबाब नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये पुरोहितच्या पाचगणी येथील घरात अभिनव भारत संघटनेची कागदपत्रे पाहिली होती. तसेच एकदा त्यांनी पुरोहित आणि आणखी चारजणांना अभिनव भारतच्या शिबिरात गाडीने सोडले होते, असेही या जबाबात म्हटले आहे. पुरोहितसह भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह या खटल्यात प्रमुख आरोपी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08381 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..