पोलिसांवरील आरोप मागे घेण्यावर निर्णय नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांवरील आरोप मागे घेण्यावर निर्णय नाही
पोलिसांवरील आरोप मागे घेण्यावर निर्णय नाही

पोलिसांवरील आरोप मागे घेण्यावर निर्णय नाही

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : गँगस्टर ख्वाजा युनूस चकमक प्रकरणात आणखी चार पोलिसांना आरोपी करण्यासाठी राज्य सीआयडीने केलेला अर्ज मागे घेण्याच्या मागणीवरील निकाल मुंबई सत्र न्यायालयाने आज राखून ठेवला. राज्य सरकारने हा अर्ज मागे घेण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या चारही पोलिसांना आरोपी करण्यासाठी युनूसची आई आसिया बेगम यांनीदेखील अर्ज केला आहे. सत्र न्या. व्ही. एम. पाथाडे यांनी याबाबत निकाल राखून ठेवला असून पुढील सुनावणी ७ सप्टेंबरला होणार आहे.
डिसेंबर २००२ मध्ये झालेल्या घाटकोपर बॉम्बस्फोटामध्ये युनूस आरोपी होता. परभणीमध्ये राहणारा आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला युनूस २७ वर्षांचा होता. पोलिसांनी त्याला परभणीमधून अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार तो पोलिस कोठडीतून पळून गेला होता, मात्र अन्य आरोपीने दिलेल्या जबाबात युनूसला चार पोलिसांनी जबर मारहाण केली होती. या चार जणांना आरोपी करण्यासाठी पोलिसांनी यापूर्वी अर्ज केला आहे.
अभियोग पक्षाने आसिया यांच्या अर्जाला विरोध केला आहे. सरकारी पक्षाने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी प्रलंबित असताना अन्य पक्षकार अर्ज करू शकतात का, असा प्रश्न ॲड. प्रदीप घरत यांनी उपस्थित केला. जर हा अर्ज मान्य केला, तर सुनावणीच्या प्रत्येक टप्प्यावर अशा पद्धतीने हस्तक्षेप केला जाऊ शकतो. त्यामुळे आसिया यांचा अर्ज अमान्य करावा, अशी मागणी घरत यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08391 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..