ज्येष्ठ नागरिकांना आजपासून एसटीचा मोफत प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिकांना आजपासून एसटीचा मोफत प्रवास
ज्येष्ठ नागरिकांना आजपासून एसटीचा मोफत प्रवास

ज्येष्ठ नागरिकांना आजपासून एसटीचा मोफत प्रवास

sakal_logo
By

ज्येष्ठ नागरिकांना आजपासून एसटीचा मोफत प्रवास
२६ ऑगस्टपूर्वी आरक्षण केलेल्या प्रवाशांना मिळणार परतावा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना गुरुवारपासून (ता. २६) मोफत प्रवासाची सुविधा सुरू झाली आहे. २६ ऑगस्टपूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या व २६ ऑगस्टपासून प्रवास करणाऱ्या नागरिकांना तिकिटाचा परतावा दिला जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास; तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या योजनेचा बुधवारी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान शुभारंभ झाल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे.
प्रवासादरम्यान आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शून्य मूल्य वर्गाची; तर ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठांना सवलतीच्या दरातील तिकीट दिले जाईल. मात्र, सदरची सवलत शहरी बसकरिता लागू होणार नाही, तसेच सदर सवलत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत अनुज्ञेय असेल, असेही चन्ने यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08396 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..