भोंग्यानंतर मनसेचे ‘नो टू हलाल’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोंग्यानंतर मनसेचे ‘नो टू हलाल’!
भोंग्यानंतर मनसेचे ‘नो टू हलाल’!

भोंग्यानंतर मनसेचे ‘नो टू हलाल’!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : राज्यात हलाल आणि झटका पद्धतीने करण्यात येणाऱ्या कत्तलीच्या मांसाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनने हलाल मांसाला विरोध केला आहे. त्याचबरोबर या हलाल मांसातील पैसा ‘टेरर फंडिंग’साठी वापरला जात असल्याचा सनसनाटी आरोपही मनसेने केला आहे. या सर्व प्रकारामुळे हिंदूंच्या उपजीविकेवर आणि महसुलावर मोठा परिणाम झाल्याचा दावा मनसेने केला आहे. मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी मनसेची भूमिका स्पष्ट करत सरकारने यावर बंदीचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ‘नो टू हलाल’ या जनजागृतीसाठी तीव्र आंदोलन उभे करणार असल्याचेही किल्लेदार यांनी सांगितले.
हलाल पद्धत केवळ धार्मिक मुद्दा नाही. तो देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याचेही किल्लेदार यांनी सांगितले. जर १५ टक्के मुस्लिमांसाठी हलाल मांसाची व्यवस्था केली जात असेल, तर इतर धर्माच्या नागरिकांनी ते का स्वीकारावे. अरब देशांमध्ये हलाल मांसाला मागणी आहे म्हणून ते हलाल केले जाते. हा पैसा दहशतवादी कृत्यातील आरोपींचे खटले लढण्यासाठी वापरला जातो, असा आरोप किल्लेदार यांनी केला आहे. हलाल हा प्राणी मारण्याचा क्रूर इस्लामिक मार्ग आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. भारतात एकप्रकारे इस्लामिक अर्थव्यवस्था उभारली जात आहे. मनसे कार्यकर्ते आणि नेते लवकरच खाद्यपदार्थ कंपन्या, रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांना पत्र लिहून हलालव्यतिरिक्त झटका मांस त्यांच्या काऊंटरमध्ये ठेवण्याची सूचना करणार आहेत. कंपन्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही, तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही किल्लेदार यांनी दिला आहे.

पंतप्रधानांना पत्र लिहिणार
पैसा कुठून येतो आणि जातो कुठे, हे समजणे गरजेचे आहे. यासाठी भारत सरकारने ऑडिट करावे. यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचेही मनसेने म्हटले आहे. ‘जमियत-ए-उलेमा’सारख्या संघटना हलाल उत्पादने बनवण्यासाठी दबाव आणत आहेत. हे लोक दहशतवाद्यांना पाठिंबा देतात आणि टेरर फंडिंग करतात, ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांच्यासाठी पैसे खर्च करतात, असेही मनसेने म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08410 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..