मुंबई विद्यापीठातील स्विमिंग पूलाचे काम अर्धवट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठातील स्विमिंग पूलाचे काम अर्धवट
मुंबई विद्यापीठातील स्विमिंग पूलाचे काम अर्धवट

मुंबई विद्यापीठातील स्विमिंग पूलाचे काम अर्धवट

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले स्वीमिंग पुलाचे काम अजूनही अर्धवट ठेवण्यात आले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शीतल शेठ-देवरुखकर यांनी केली आहे.
कलिना संकुलात स्वीमिंग पुलासह इतर अनेक बांधकामे ही अर्धवट ठेवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन इमारतींच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरू केले आहे. त्‍यामुळे आत्तापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून ज्या इमारती अर्धवट ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यांना कोण जबाबदार, असा सवाल शीतल शेठ-देवरुखकर यांनी केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांच्या तरतुदी करूनही अनेक इमारती आणि वास्तू या अर्धवट पडून आहेत, ज्या तयार झालेल्या आहेत, त्याचा वापर केला जात नाही, त्यामुळे विद्यार्थ्यी हितासाठी असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा हा गैरवापर करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, कलिना संकुलातील स्वीमिंग पुलात साचलेल्या पाण्यात मागील आठवड्यात डेंगीच्या आळ्या सापडल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी यांच्या वसाहतींमध्ये रक्ततपासणी आदी कार्यक्रम महापालिकेला राबविण्याची वेळ ओढवली होती. त्यानंतरही येथे अशीच दुरवस्था असून यासाठी कोण जबाबदार, असा सवाल शीतल शेठ-देवरुखकर यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08412 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..