सौरभ त्रिपाठीच्या मेहुण्याला जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सौरभ त्रिपाठीच्या मेहुण्याला जामीन
सौरभ त्रिपाठीच्या मेहुण्याला जामीन

सौरभ त्रिपाठीच्या मेहुण्याला जामीन

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : अंगाडिया खंडणीवसुली प्रकरणात आरोपी असलेल्या फरारी पोलिस अधिकारी सौरभ त्रिपाठीच्या मेहुण्याला मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मागील चार महिन्यांपासून आरोपी आशुतोष मिश्रा अटकेत होता. यापूर्वी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मिश्रा उत्तर प्रदेशमधील विक्री कर विभागात जीएसटी विभागात अधिकारी पदावर आहे. त्रिपाठी या प्रकरणात आरोपी असून अद्याप त्याने आपल्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला नाही. पोलिस त्याचा तपास करत आहेत. त्याच्या कुटुंबातील अन्य काही सदस्यांची चौकशी पोलिस करत आहेत. अंगाडियांकडून खंडणीवसुली केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08413 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..