दोषमुक्त करण्यासाठी अभिनेत्री गहनाचा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोषमुक्त करण्यासाठी अभिनेत्री गहनाचा अर्ज
दोषमुक्त करण्यासाठी अभिनेत्री गहनाचा अर्ज

दोषमुक्त करण्यासाठी अभिनेत्री गहनाचा अर्ज

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांतून दोषमुक्त करण्याची मागणी करणारा अर्ज अभिनेत्री वंदना रवींद्र तिवारी ऊर्फ गेहान वशिष्टने मुंबईतील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात केला आहे. व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रानेही काही दिवसांपूर्वी असा अर्ज केला आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या आणखी एका प्रकरणात सायबर पोलिसांनी राज कुंद्रासह अभिनेत्री शार्लिन चोप्रा, पूनम पांडे, सुवांजित चौधरी, व्यावसायिक उमेश कामत, सॅम अहमद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कुंद्राला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. आता त्याने आणि गहनाने दोषमुक्ततेचा अर्ज केला आहे. अतिरंजित सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येतात आणि भारतात यावर बंदी नाही, असा दावा तिने केला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये मालवणी पोलिसांनी एका छाप्यात अश्लील व्हिडीओ बनवणारे रॅकेट उघड केले आहे. गहनाने अनेक अभिनेत्रींना अशा सिनेमात काम करण्यासाठी प्रवृत्त केले आणि जबरदस्ती केली, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08414 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..