अकरावी प्रवेशासाठी ६ सप्टेंबरपर्यंतची मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी प्रवेशासाठी ६ सप्टेंबरपर्यंतची मुदत
अकरावी प्रवेशासाठी ६ सप्टेंबरपर्यंतची मुदत

अकरावी प्रवेशासाठी ६ सप्टेंबरपर्यंतची मुदत

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : मुंबईसह राज्यातील पाच महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष प्रवेश फेरीच्या वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केला आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता गुणवत्ता यादी ३० ऑगस्टऐवजी १ सप्टेंबरला जाहीर होणार आहे; तर यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ६ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या काळातच ११ वीच्या विशेष फेरीतील प्रवेश प्रक्रियेचे नियोजन केले होते; मात्र त्यामुळे कोकणात जाणाऱ्या शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनीही शिक्षण विभागाकडे या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली होती. या काळात प्रवेश झाले तर असंख्य विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाची संधी हुकेल असा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर नवीन वेळापत्रक आज जारी करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पहिल्या तीन प्रवेश फेऱ्यांमध्ये मिळालेला प्रवेश रद्द करायचा असल्यास आधीचा प्रवेश रद्द करून विशेष फेरीत पुन्हा अर्ज करावा लागेल. अर्ज भरण्याच्या मुदतीत विद्यार्थ्यांनी आधीचा प्रवेश रद्द करून पुन्हा महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे आवश्यक असेल, असेही सांगण्यात आले.
शिक्षण विभागाच्या सुधारित वेळापत्रकानुसार पुन्हा अर्ज भरण्यासाठी २९ ऑगस्टला‍ सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत विद्यार्थी कोटा प्रवेशासाठी ऑलाईन पसंती नोंदवू शकतात. त्याचबरोबर द्विलक्षी अभ्यासक्रमासाठीही अर्ज करता करता येणार आहे. प्रवेश फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पसंती नोंदवून अर्ज लॉक करणे आवश्यक आहे.

सुधारित वेळापत्रक
२९ ऑगस्ट : ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे
३० ते ३१ ऑगस्ट : गुणवत्ता यादी तयार करणे
१ सप्टेंबर : गुणवत्ता यादी जाहीर
१ ते ६ सप्टेंबर : प्रवेश निश्चित करणे
७ सप्टेंबर : रिक्त जागा जाहीर होणार

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08416 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..