युजीसीकडून २१ विद्यापीठे बोगस घोषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युजीसीकडून २१ विद्यापीठे बोगस घोषित
युजीसीकडून २१ विद्यापीठे बोगस घोषित

युजीसीकडून २१ विद्यापीठे बोगस घोषित

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील २१ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या बोगस विद्यापीठांमध्ये सर्वाधिक विद्यापीठे दिल्ली आणि त्याखालोखाल ४ विद्यापीठे उत्तर प्रदेशातील असून महाराष्ट्रातील नागपूरच्या राजा अरेबिक विद्यापीठाचाही त्यामध्ये समावेश आहे. या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन आयोगाने विद्यार्थ्यांना केले आहे.
विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध अधिनियमांचे या संस्थांनी उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या विद्यापीठे सुरू ठेवली आहेत. त्यामुळे ही सर्व विद्यापीठे बोगस असून, त्यांना यूजीसीची कोणतीही मान्यता देण्यात आली नाही, असेही आयोगाकडून कळविण्यात आले आहे. बोगस विद्यापीठांमध्ये सर्वाधिक ८ विद्यापीठे ही देशाची राजधानी दिल्लीत कार्यरत आहेत. त्या खालोखाल उत्तर प्रदेशात चार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रत्येकी दोन, पुद्दूचेरी, केरळ, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकी एक बोगस विद्यापीठ कार्यरत आहे.

ही आहेत बोगस विद्यापीठे
दिल्ली : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटी (अलीपूर), कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड (दरियागंज), युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, ए. आर. डी. सेंट्रिक युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी, आध्यात्मिक विश्वविद्यालय
उत्तर प्रदेश : गांधी हिंदी विद्यापीठ (प्रयाग), नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी (कानपूर), नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी (अचलताल), भारतीय शिक्षा परिषद भारत भवन (लखनौ)
कर्नाटक : वडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी (बेळगाव)
केरळ : सेंट जॉन युनिव्हर्सिटी (कृष्णाटम)
महाराष्ट्र : राजा अरेबिक युनिव्हर्सिटी (नागपूर)
पुद्दुचेरी : श्री बोधी अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन
आंध्र प्रदेश : क्राइस्ट न्यू टेस्टमेन्ट डिम्ड युनिव्हर्सिटी (गुंटूर)
पश्चिम बंगाल : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन (कोलकाता), इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च (कोलकाता)
ओडिशा : नवभारत शिक्षा परिषद (राउरकेला), नॉर्थ ओडिसा युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी (बारीपदा)

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08424 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..