अक्षय ऊर्जेबाबत महावितरणला पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय ऊर्जेबाबत महावितरणला पुरस्कार
अक्षय ऊर्जेबाबत महावितरणला पुरस्कार

अक्षय ऊर्जेबाबत महावितरणला पुरस्कार

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि असोसिएशन ऑफ रिन्यूएबल एनर्जी एजन्सी ऑफ स्टेट्स (एआरईएएस) यांनी अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महावितरणचा गौरव करण्यात आला. ‘एआरईएएस’च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त कोची येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा आणि रसायने व खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे आणि संचालक वाणिज्य डॉ. मुरहरी केळे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्वोच्च रूफटॉप सौर ऊर्जा स्थापित क्षमता प्राप्त करणे आणि २०२१-२२ मध्ये सर्वाधिक रूफटॉप सौर ऊर्जा क्षमता जोडण्यासाठी महावितरणला हे दोन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच नोडल एजन्सी असलेल्या महाऊर्जाला ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्वोच्च बायोमास पॉवर स्थापित क्षमता आणि प्लांट्सची स्थापित संख्या प्राप्त करण्याने त्यांना दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आले. हा पुरस्कार महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सूरज वाघमारे यांनी स्वीकारला. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्काराबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08434 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..