ज्येष्ठांसाठी गणपती दर्शन यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठांसाठी गणपती दर्शन यात्रा
ज्येष्ठांसाठी गणपती दर्शन यात्रा

ज्येष्ठांसाठी गणपती दर्शन यात्रा

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : गणेशोत्सव आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्याचा पर्यटन विभाग व मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर महापालिकांतर्फे या महानगरांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे.
एक, दोन, पाच, सहा व सात सप्टेंबर या पाच दिवशी ही यात्रा आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शहरांतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेश मंदिरांत नेले जाईल. यासाठी बृहन्मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर महापालिकेकडून वातानुकूलित बस, आरोग्यसेवक, गाईड व न्याहारी अशा सुविधा दिल्या जातील. तसेच सर्व मंडळे व मंदिरात दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जाईल. या योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
...
अधिक माहिती-नोंदणीसाठी संपर्क
मुंबई : सुहास ७७३८६९४११७ / अजिंक्य ८७७९८९८००१
ठाणे : प्रशांत ९०२९५८१६०१ / कल्याणी ७०३०७८०८०२
पुणे : अजय ७८८७३९९२१७ / पुजारी ८८८८३६३६४७
नागपूर : पंकज ९६६५८५२०२१ / रजनी ९७६४४८१९१३

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08438 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..