गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता बाधितांचे कांजूरमार्गला पुनर्वसन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता 
बाधितांचे कांजूरमार्गला पुनर्वसन
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता बाधितांचे कांजूरमार्गला पुनर्वसन

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता बाधितांचे कांजूरमार्गला पुनर्वसन

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पबाधितांसाठी कांजूरमार्गमध्ये घरे बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. ९०६ प्रकल्पग्रस्तांसाठी २३ मजली दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी ३३२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले; परंतु प्रकल्पात बाधित झालेल्या ९२० रहिवाशांना अद्याप कायमस्वरूपी घरे मिळालेली नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यासाठी कांजूरमार्गमध्ये घरे बांधण्यात येणार असून कामाचे कंत्राट मे. देव इंजिनियर कंपनीला देण्यात आले आहे. पावसाळा वगळून कंत्राटदाराला १८ महिन्यांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करायचे आहे.

प्रकल्पातील सुविधा
प्रकल्पातील अंतर्गत रस्त्यालगत पदपथ, पावसाळी जलवाहिनी, सुरक्षा भिंत, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाण्याची टाकी, मलःनिसारण ​​आदींसह एसटीपी प्रकल्पही तयार करण्यात येणार आहे. त्याशिवाय संकुलात बालवाडी, अंगणवाडी, वाचन कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

प्रकल्प दृष्टिक्षेपात
क्षेत्रफळ ः ३९,६९८.१० चौ. मीटर
बांधकाम पद्धत ः आरसीसी, स्टील प्री-फॅब्रिकेटेड
खर्च ः ३३२.७१ कोटी

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08439 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..