पॉलिटेक्निकच्या प्रवेशाचा टक्का वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॉलिटेक्निकच्या प्रवेशाचा टक्का वाढला
पॉलिटेक्निकच्या प्रवेशाचा टक्का वाढला

पॉलिटेक्निकच्या प्रवेशाचा टक्का वाढला

sakal_logo
By

पॉलिटेक्निकच्या प्रवेशाचा टक्का वाढला
पहिल्या प्रवेश फेरीतच ६६ हजार विद्यार्थ्यांची निवड

मुंबई, ता. २८ : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि दहावीनंतर थेट प्रवेश घेता येणाऱ्या राज्यातील पॉलिटेक्निकच्या प्रवेशाचा टक्का यंदाही वाढला आहे. या प्रवेशाची पहिल्या यादीची निवड प्रक्रिया नुकतीच झाली असून यात विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदाही वाढत असल्याचे समोर आले आहे. पहिल्या यादीतच तब्बल ६६ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि अधिकाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांकडून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आपली पसंती दाखवत त्यासाठी अर्ज केले आहेत. त्यात यावर्षी ३६५ संस्थामध्ये उपलब्ध असलेल्या १ लाख १ हजार ८६१ जागांसाठी गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ३५ हजारहून अधिक अर्जात वाढ झाली. यावर्षी १ लाख २४ हजार ३८५ अर्ज आले होते. त्यापैकी पहिल्या फेरीसाठी सुमारे १ लाख १ हजार २२४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यामधील ६६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पहिल्या फेरीत अलॉटमेंट मिळाले; तर ३१ हजार १७९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचा अभ्यासक्रम या यादीत मिळाला आहे. प्रवेश घेण्याची मुदत ३० ऑगस्टपर्यंत आहे.
पहिल्या यादीत १०० टक्के असणाऱ्या एकूण ४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये ३ विद्यार्थिनी; तर एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ९५ टक्क्यांवरील ३६६ गुणवंतांना पॉलिटेक्निकसाठी प्रवेश मिळाला आहे. शिवाय ९० ते ९५ टक्क्यांमधील ५,१२० विद्यार्थ्यांचा समावेश ही यात आहे. ८० ते ९० टक्क्यांमधील तब्बल २१ हजार विद्यार्थ्यांचाही समावेश अलॉटमेंटमध्ये असल्याची माहिती तंत्र शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08449 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..