अकराशे जणांना हवाय ‘दृष्टी’कोन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकराशे जणांना हवाय ‘दृष्टी’कोन!
अकराशे जणांना हवाय ‘दृष्टी’कोन!

अकराशे जणांना हवाय ‘दृष्टी’कोन!

sakal_logo
By

किकर - नेत्रदान पंधरवडा
---

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गेली दोन वर्षे कोरोनामुळे नेत्रदान चळवळीला मोठा फटका बसला होता; मात्र आता हळूहळू पुन्हा एकदा या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या राज्यात एक हजार १५३ नागरिक डोळ्यांसाठी प्रतीक्षा यादीत आहेत. नेत्रदानाचे प्रमाण वाढले तरच प्रतीक्षा यादीत असलेल्या नागरिकांची संख्या कमी होईल, अशी आशा नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नेत्रदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यात नेत्रदान पंधरवड्याचे आयोजन केले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्‍यात एप्रिल ते जुलै २०२२ या कालावधीत एक हजार ३६६ नागरिकांच्या बुबुळाचे दान करण्यात आले आहे. यापैकी ७७६ नागरिकांच्या एक किंवा दोन्ही डोळ्यांवर किरोलोप्लास्टी करण्यात आली. शिवाय वैद्यकीय शिक्षणासाठी ही काही बुबुळे देण्यात आली आहेत. आजही नेत्रदानाबद्दल समाजात अनेक गैरमसज आहेत. त्यामुळे अनेकांचे नातेवाईक मृत्यूनंतरही नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत, अशी खंत आता व्यक्त होत आहे. अंधांना ‘दृष्टी’कोन देण्यासाठी नेत्रदानाची गरज असून नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
भारतात २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान दरवर्षी राष्ट्रीय नेत्रदान पंधरावडा साजरा केला जातो. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन ते चार जणांच्या आयुष्यात प्रकाश पडू शकतो. विशेषत: ज्या व्यक्तीचा कॉर्निया म्हणजे बुबुळ खराब झाले आहे, अशा व्यक्तीला बुबुळ प्रत्यारोपण केल्यानंतर दृष्टी मिळू शकते. नेत्रदान केलेल्या दात्यांच्या डोळ्यांच्या केवळ बुबुळांचे प्रत्यारोपण केले जाते. पूर्ण नेत्रगोलाचे होत नाही म्हणून त्याला नेत्ररोपण न म्हणता ‘बुबुळ रोपण’ असेही म्हटले जाते.
........
‘होटा’ म्हणजेच ‘ह्यूमन ऑर्गन ट्रान्सप्लांट अॅक्ट’अंतर्गत नेत्रदानाची प्रक्रिया केली जाते. या कायद्यांतर्गत नेत्रपेढीची नोंदणी केली जाते. आजही अनेकांना दृष्टीची गरज आहे. फक्त बुबुळ नाही तर टिश्यूज ही दान केले जातात. त्यातून अनेकांना दृष्टी मिळते.
- डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालक, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
........
जीवंतपणी नेत्रदान करता येत नाही, पण मरणोत्तर नेत्रदान करून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणता येतो.
- डॉ. साधना तायडे, संचालक, आरोग्यसेवा

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08458 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..