जिओ व रिलायन्स रिटेलचे आयपीओ वर्षभर नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिओ व रिलायन्स रिटेलचे आयपीओ वर्षभर नाहीत
जिओ व रिलायन्स रिटेलचे आयपीओ वर्षभर नाहीत

जिओ व रिलायन्स रिटेलचे आयपीओ वर्षभर नाहीत

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ ः रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ यांचे आयपीओ निदान वर्षभर तरी येणार नाहीत, अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आज कंपनीच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

रिलायन्सच्या या दोन्हीही वेगाने घोडदौड करणाऱ्या कंपन्यांचे आयपीओ कधी येतात याची सर्वांना प्रतीक्षा आहे. मात्र आपण त्याचे वेळापत्रक कंपनीच्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करू, असे सांगून अंबानी यांनी सर्वांच्या उत्साहावर पाणी ओतले.

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेलची उलाढाल दोन लाख कोटींच्यावर झाली असून आता ही कंपनी रिलायन्स ग्रुपमधील सर्वात मोठी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. रिलायन्स रिटेलचे नेतृत्व करणाऱ्या ईशा अंबानी यांचीही त्यांनी या निमित्ताने प्रशंसा केली.

रिलायन्स रिटेल लवकरच एफएमसीजी क्षेत्रातही पदार्पण करणार आहे, अशी माहिती कंपनीच्या संचालक ईशा अंबानी यांनी यावेळी दिली. त्याद्वारे प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उच्च दर्जाची आणि परवडणारी उत्पादने तयार केली जातील. याप्रकारे आम्ही हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, ब्रिटानिया आदी कंपन्यांशी स्पर्धा करू. त्याचबरोबर भारतातील आदिवासी तसेच अन्य मागास समुदायातील नागरिकांनी बनवलेली दर्जेदार उत्पादनेही बाजारात आणू, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08459 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..