२२ खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२२ खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओची कारवाई
२२ खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओची कारवाई

२२ खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओची कारवाई

sakal_logo
By

७ दिवसांत २२ खासगी ट्रॅव्हल्सवर आरटीओची कारवाई
जादा प्रवासी भाडे वसूल करत असल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गौरी-गणपतीसाठी शेवटच्या टप्प्यात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आर्थिक लूट चालवली असल्याचा प्रवासी संघटनांकडून आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी करण्याचे सुरू केल्यानंतर गेल्या ७ दिवसांत सुमारे २२ खासगी बसेसवर कारवाई केल्याचे वडाळा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले.

लांजा, चिपळूण, कोल्हापूर या मार्गावर वाहनांवर कारवाई झाली असून २४ तास परिवहन विभागाचे भरारी पथक कार्यरत आहे. रस्त्यावरील चौकशीदरम्यान या बसेसवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत त्या बसेसवर कारवाई केली जाणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले. ही कारवाई नियमित सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यामध्ये सुमारे ८० टक्के बसेसमध्ये खासगी ट्रॅव्हल्स चालकांना निश्चित करून दिलेले भाडे दरापेक्षाही कमी भाडे आढळून आले असून, काही ट्रॅव्हल्समध्ये समांतर भाडे घेण्यात आले आहे; तर जादा भाडे आकारणाऱ्या बसेसची संख्या कमी असल्याचेही अहिरे यांनी सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08466 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..