पाठ्यपुस्तकालाच जोडून वह्यांची पाने! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाठ्यपुस्तकालाच जोडून वह्यांची पाने!
पाठ्यपुस्तकालाच जोडून वह्यांची पाने!

पाठ्यपुस्तकालाच जोडून वह्यांची पाने!

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तकांमध्ये बदल केला जाणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना वापराव्या लागणाऱ्या वह्यांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडून दिली जाणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली.
केसरकर म्हणाले, सध्या आम्ही द्विभाषिक पाठपुस्तकांच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकाचे तीन भाग केले आहेत. त्याच पुस्तकांना जोडून जर लिखाणाची सोय केली तर पाठ्यपुस्तक आणि वह्यांचे ओझे आपोआप कमी होईल. विद्यार्थ्यांना त्याच पुस्तकात आपले मुद्दे लिहिता येतील. काही शंका असल्यास ते त्याच पुस्तकात पाहता येईल. पर्यायाने त्यांच्या पाठीवरील ओझेही कमी होईल. त्याचा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
राज्यातील शाळांमध्ये यंदा पाठ्यपुस्तकाचे ओझे करण्यासाठी द्विभाषिक पाठपुस्तकांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यात पहिलीतील नव्या पाठ्यपुस्तकांचे वजन केवळ २५० ग्रॅम एवढे आहे. त्यामुळे आतापर्यंत जे विद्यार्थी साधारणपणे ८०० ते ८५० ग्रॅम पाठ्यपुस्तकांचे ओझे वाहत होते, ते ओझे आपोआप कमी झाले आहे. शिवाय पुस्तकाची रचना ही रंगीबेरंगी आणि आकर्षक स्वरूपाची करण्यात आल्याचे केसरकर म्हणाले.
----
वह्याची पाने आता पुस्तकाला जोडून दिली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे आपोआप कमी होईल.
- दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री
--
पुस्तकांची ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुस्तकांना जोडून वह्यांची पाने लावून देण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेतला तर त्याचे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही स्वागत करतील; मात्र हा निर्णय घेताना पुस्तकांचे दर वाढणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी.
- सुधीर घागस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08467 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..