राज्यात स्वाईन फ्लूचे ९८ मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात स्वाईन फ्लूचे ९८ मृत्यू
राज्यात स्वाईन फ्लूचे ९८ मृत्यू

राज्यात स्वाईन फ्लूचे ९८ मृत्यू

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : राज्यात स्वाईन फ्ल्यू आजाराचा कहर झाला आहे. १ जानेवारी ते २८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत २,३३७ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गणपती उत्सव सुरू झाला असून राज्यात वाढत्या स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जनतेने योग्य खबरदारी घेऊन उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन राज्य आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना फ्ल्यूसदृश लक्षणे आहेत, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा. फ्ल्यूसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याने वेळेवर उपचार घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
...
चार शहरांत अधिक रुग्ण
ठाणे, पुणे , मुंबई आणि नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे ४७४, मुंबईत ३४८, पुण्यात ७७०, नाशिकमध्ये १९५ रुग्ण सापडले आहेत. पुण्यात ३३, ठाण्यात १४, मुंबईत ३ आणि नाशिकमध्ये १२ मृत्यू झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08472 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..