अभियांत्रिकी सीईटीचा निकाल १५ सप्टेंबरपूर्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकी सीईटीचा 
निकाल १५ सप्टेंबरपूर्वी
अभियांत्रिकी सीईटीचा निकाल १५ सप्टेंबरपूर्वी

अभियांत्रिकी सीईटीचा निकाल १५ सप्टेंबरपूर्वी

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेचा निकाल १५ सप्टेंबरपूर्वी जाहीर केला जाणार आहे. या निकालापूर्वी सीईटी सेलकडून गुरुवारी (ता. १) उत्तरसूची उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा ५ ते २० ऑगस्टदरम्यान पार पडली. या परीक्षेला राज्यभरातून सुमारे चार लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेची उत्तरसूची १ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यावरील आक्षेप २ ते ४ सप्टेंबरपर्यंत नोंदवता येणार आहे. त्यानंतर १५ सप्टेंबर किंवा त्यापूर्वी अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सीईटी सेलकडून कळवण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08473 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..