टाटा पॉवरकडून २०२३ पर्यंत एक लाख स्मार्ट मीटर बसवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाटा पॉवरकडून २०२३ पर्यंत 
एक लाख स्मार्ट मीटर बसवणार
टाटा पॉवरकडून २०२३ पर्यंत एक लाख स्मार्ट मीटर बसवणार

टाटा पॉवरकडून २०२३ पर्यंत एक लाख स्मार्ट मीटर बसवणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : टाटा पॉवरने मुंबईतील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरिंग मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मार्च २०२३ पर्यंत एक लाख स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत, तर २०२५ पर्यंत मुंबईतील ७.५ लाख ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
टाटा पॉवर मुंबई वितरणाने स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. त्यानुसार गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल ७५ हजारपेक्षा जास्त ग्राहकांसाठी यापूर्वीच स्मार्ट मीटर बसवले आहेत. यामध्ये ६ महिन्यांच्या अल्प कालावधीत एंड-टू-एंड बिलिंग, ग्राहक संबंध व्यवस्थापन आणि भौगोलिक माहिती प्रणालीसह १ लाख स्मार्ट मीटरिंग पॉइंटसाठी पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, सर्व स्मार्ट मीटर ग्राहकांना रिअल टाईम वीज वापर आणि विश्लेषण प्रदान करण्यासाठी एक वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशनदेखील विकसित केल्याची माहिती टाटा पॉवरचे नीलेश काणे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08488 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..