सेन्सेक्स ७७० अंश घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्स ७७० अंश घसरला
सेन्सेक्स ७७० अंश घसरला

सेन्सेक्स ७७० अंश घसरला

sakal_logo
By

मुंबई, ता. १ ः जागतिक अस्थिर परिस्थितीमुळे आज भारतीय शेअरबाजार निर्देशांक सव्वा टक्क्यांच्या आसपास घसरले. अमेरिका, युरोप, चीन आदी सर्वच आघाड्यांवरून निराशाजनक बातम्या आल्याने सेन्सेक्स ७७०.४८ अंश; तर निफ्टी २१६.५० अंश घसरला. त्यामुळे आज सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण मालमत्तेचे मूल्य सुमारे दोन लाख कोटी रुपयांनी घसरले.

अमेरिकी ‘फेड’च्या व्याजदरवाढीच्या शक्यतेमुळे अमेरिका व युरोपीय शेअरबाजार घसरलेलेच होते. युरोप व जपानमधील चलनवाढीचे भीतीदायक आकडे आल्याने आणि चीनमध्ये पुन्हा वाढीचा वेग मंदावण्याच्या बातम्यांमुळे आशियाई शेअरबाजारांमध्येही घसरण झाली. त्याचाच कित्ता भारतीय शेअरबाजारांनी गिरवला आणि दिवसअखेरीस सेन्सेक्स ५८,७६६.५९ अंशांवर, तर निफ्टी १७,५४२.८० अंशांवर स्थिरावला.

भारतीय जीडीपीचा तपशील अपेक्षेनुसार नसल्याने भारतीय शेअरबाजारांमध्येही निराशेचे वातावरण होते; तर चीन-तैवान वादामुळेही सर्वत्र दाटून आलेल्या निराशेच्या वातावरणात आणखी भर पडली. बीएसईवरील सर्व शेअरचे एकूण बाजारमूल्य आज १.९० लाख कोटी रुपयांनी घसरून २७८ लाख कोटी रुपयांवर आले. भारतीय शेअरबाजारांमध्ये आज आयटी, औषध कंपन्या, धातूनिर्मिती कंपन्या, वित्तसंस्था यांच्या शेअरचे भाव घसरले. बीएसईवरील प्रमुख तीसपैकी २३ शेअर तोट्यात होते, तर एनएसईच्या मुख्य ५० पैकी ३८ शेअरचे भाव घसरले.

आज बीएसईवर बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट, एअरटेल या शेअरचे भाव एक ते सव्वादोन टक्के वाढले; तर त्याउलट रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, सनफार्मा, टेक महिंद्र, हिंदुस्थान युनिलीव्हर, एनटीपीसी, इन्फोसिस, एचडीएफसी, टाटा स्टील, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, नेस्ले, डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी बँक, अॅक्सीस बँक, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, विप्रो, कोटक बँक, लार्सन अँड टुब्रो या शेअरचे भाव अर्धा ते तीन टक्के घसरले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08504 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..