गर्भवती महिलांसाठी हवे बहुविद्याशाखीय पथक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्भवती महिलांसाठी हवे
बहुविद्याशाखीय पथक!
गर्भवती महिलांसाठी हवे बहुविद्याशाखीय पथक!

गर्भवती महिलांसाठी हवे बहुविद्याशाखीय पथक!

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : कोरोनानंतर मंकीपॉक्स विषाणूने जगभरात चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्सचा सर्वाधिक धोका गर्भवती महिला आणि लहान मुलांना आहे. यासंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थने काही शिफारशी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांसाठी सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची एक बहुविद्याशाखीय टीम तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
मंकीपॉक्सबाबत जगभरातील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ - साऊथ ईस्ट एशिया जर्नल’ने देशातील गर्भवती महिलांमध्ये मंकीपॉक्स संसर्गाबाबत शिफारशी प्रकाशित केल्या आहेत. या शिफारशी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. तसेच तज्ज्ञांनी गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला आणि लहान मुलांमध्ये मंकीपॉक्सचा वाढता धोका आणि त्यामुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आयसीएमआरने नायर रुग्णालयाच्या सहकार्याने गर्भवती महिलांमध्ये कोविडसाठी ‘प्रेगकोविड’ नोंदणी सुरू केली होती. त्या आधारे देशातील गरोदर महिलांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग हाताळण्यासाठी महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. याबाबत प्रेगकोविड रजिस्ट्रीचे डॉ. राहुल गजभिये म्हणाले की, देशातील गर्भवती महिला आणि नवजात बालकांमध्ये मंकीपॉक्सचे निदान आणि व्यवस्थापन करण्यासाठी काही शिफारशी करण्यात आल्या आहेत. विषाणूच्या संपर्कात आलेल्या गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या नोंदणीचा ​​वेग वाढवण्याचीही शिफारस करण्यात आली. जेणेकरून त्यांना विषाणूविषयी अचूक माहिती मिळू शकेल.
---
नवजात शिशूमध्ये मंकीपॉक्सबाबत बारकाईने अभ्यास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच गर्भवती महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना असलेल्या धोक्याबाबतही अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच योग्य ती काळजी घेण्यासाठी उपाययोजना निश्चित केल्या आहेत.
- डॉ. नीरज महाजन, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, नायर रुग्णालय
---
प्रमुख शिफारशी
- आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती आणि प्रशिक्षण
- ग्रामीण आणि शहरी भागात विलगीकरण सुविधा निर्माण करणे
- सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये प्रसूती तज्ज्ञ, नवजात तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांची बहुविद्याशाखीय टीम असावी.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08516 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..