केईएम रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केईएम रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा सत्कार
केईएम रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा सत्कार

केईएम रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा सत्कार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा मिळावी, यासाठी केईएम रुग्णालय प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी ‘स्टार ऑफ द मंथ’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत ऑगस्ट महिन्यात उत्कृष्ट काम केलेल्या चार कर्मचाऱ्यांना ‘स्टार ऑफ द मंथ’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या उपक्रमातून कर्मचारीवर्गाचे कौतुक आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्या कामाचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी मदत होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते आतापर्यंत तीन वेळा सुरक्षा रक्षक, परिचारिका, सफाई कामगार आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचा दरमहिन्याला ‘स्टार ऑफ द मंथ’चे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे; तर ऑगस्टमध्ये केईएमच्या परिसेविका राजश्री बोडरे, सफाई कामगार धीरज परमार, कनिष्ठ लघुलेखक मीना नरसिंह, तसेच मुख्य सुरक्षा रक्षक नितीन विठ्ठल भोसले यांना गौरवण्यात आले. हा उपक्रम कामयस्वरूपी सुरू राहणार असल्याचे डॉ. रावत यांनी साांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08519 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..