केईएम रुग्णालय बनले शवांच्या प्रशिक्षणाचे केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केईएम रुग्णालय बनले शवांच्या प्रशिक्षणाचे केंद्र
केईएम रुग्णालय बनले शवांच्या प्रशिक्षणाचे केंद्र

केईएम रुग्णालय बनले शवांच्या प्रशिक्षणाचे केंद्र

sakal_logo
By

केईएम रुग्णालयात शवविच्छेदन प्रयोगशाळा
दोनशेहून अधिक डॉक्टरांना अवयव काढण्याचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : अवयवदानाच्या संथ प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि त्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी डॉक्टरांना मेंदूमृत व्यक्तीच्या शरीरातील विविध अवयव कसे काढावेत याचे प्रशिक्षण दिले जात आहे. केईएम रुग्णालयात नुकत्याच सुरू झालेल्या कॅडेव्हर ट्रेनिंग लॅबमध्ये डॉक्टरांना त्याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जात आहे. लॅबमध्ये केवळ मुंबईतूनच नव्हे; तर परराज्यांतूनही डॉक्टर प्रशिक्षणासाठी येत आहेत. आतापर्यंत चार बॅचचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. चार बॅचमधील दोनशेहून अधिक डॉक्टरांनी शरीरातील अवयव काढून टाकण्याची कला आत्मसात केली आहे, अशी लॅब सुरू करणारे केईएम रुग्णालय आता शवविच्छेदन प्रशिक्षणाचे केंद्र बनले आहे.
  कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर मुंबईतील अवयवदानाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, यंदा त्याला काहीसा वेग आला आहे. एवढेच नव्हे तर रिजनल कम स्टेट ऑर्गन ॲण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (रोटो-सोटो) पश्चिम विभागाने अवयवदानासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत राज्यातील पहिली कॅडेव्हर ट्रेनिंग लॅब एप्रिलमध्ये मुंबईतील केईएम रुग्णालयात सुरू करण्यात आली.
रोटो-सोटो पश्चिम विभागाच्या संचालिका डॉ. सुजाता पटवर्धन म्हणाल्या, ‘सध्या १० ते १२ मोठ्या रुग्णालयांमध्ये अवयवदान आणि प्रत्यारोपण केले जात आहे. प्रत्यारोपणासाठी शरीरातून अवयव कसा काढायचा याची सर्व डॉक्टरांनाही माहिती नसते. त्यामुळे ‘रोटो-सोटो’तर्फे अशी प्रशिक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. त्याला विविध राज्यांतील डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत आहे. प्रयोगशाळेत आतापर्यंत चार बॅचचे प्रशिक्षण झाले. प्रत्येक बॅचमध्ये ५० ते ६० डॉक्टरांची टीम असते.’ बाहेरच्या राज्यांतून अवयव आणायला वेळ लागतो. अवयव काढण्यासाठी अनुभवी डॉक्टरांची कमतरता असल्याचे कारण सांगितले जात आहे. प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णालयातील अनुभवी डॉक्टर अवयव काढण्यासाठी पोहोचतात. त्यांच्या इच्छेनुसार अवयव काढून घेतात. त्यामुळे विलंब होतो. प्रशिक्षणामुळे अनुभवी डॉक्टरांची कमतरता दूर होण्यास मदत होईल. प्रत्येक रुग्णालयात अवयव काढण्यासाठी डॉक्टर सहज उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

असे झाले प्रशिक्षण
डॉ. सुजाता पटवर्धन यांनी हृदय, यकृत, मूत्रपिंड, लहान आतडे इत्यादी शरीरापासून कसे वेगळे होतात याचे प्रशिक्षण डॉक्टरांना दिले जाते. तिसऱ्या कार्यशाळेत डॉ. रवी मोहंका आणि डॉ. रामकृष्ण प्रभू यकृताचे प्रशिक्षण देतात. डॉ. सुजाता पटवर्धन, डॉ. जयेश धबलिया आणि डॉ. प्रकाश पवार डॉक्टरांना मूत्रपिंडाबाबत प्रशिक्षण देतात. बालाजी ऐरोनी यांनी हृदयदानाबाबत प्रशिक्षण दिले. चौथ्या कार्यशाळेत चार सर्जिकल मॉड्युल्सचा समावेश होता. जेथे सहभागी झालेल्यांना प्रशिक्षण घेण्याची संधी होती. २७ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. जिग्नेश गांधी यांनी पोटाच्या सर्जिकल कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात लेप्रोस्कोपिक आणि ओपन सर्जरीचे प्रशिक्षण दिले गेले. डॉ. हेतल मारफातिया यांनी कान-नाक-घशाबाबत सर्जिकल कार्यशाळा घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08534 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..