गो इको विथ बाप्पा ! पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी सोशल मिडियाचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गो इको विथ बाप्पा ! पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी सोशल मिडियाचा आधार
गो इको विथ बाप्पा ! पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी सोशल मिडियाचा आधार

गो इको विथ बाप्पा ! पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी सोशल मिडियाचा आधार

sakal_logo
By

गो इको विथ बाप्पा!
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी समाजमाध्यमाचा आधार

मुंबई, ता. ७ : पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन संचालनालयातर्फे सेलिब्रिटी गणपती मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी समाजमाध्यमाचा आधार घेतला जात आहे. त्याअंतर्गत मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सेलिब्रिटींच्या बाप्पाला सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तांपर्यंत पोचवले जात आहे. आता विसर्जनानिमित्तही त्याचा आधार घेण्यात येणार आहे. त्यासाठी अभिनेता जॅकी श्रॉफसह अनेक सेलिब्रिटींची मदत घेतली जात आहे.

सेलिब्रिटी गणपती मोहिमेत जॅकी श्रॉफसह अभिजीत खांडकेकर, अभिजीत सावंत, मेघा धाडे, जय धुडाणे, करण वाही आणि इतर अनेकांनी उत्सवादरम्यान पर्यावरणपूरक बाप्पाचे घरोघरी स्वागत करण्याचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाला सहकार्य केले आहे. त्याचबरोबर आपल्या पर्यावरणपूरक मूर्तींचे प्रदर्शनसुद्धा ते करत आहेत. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता सण साजरा करण्याचा संदेश ते आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर करत आहेत. सोशल मीडिया मोहिमेसाठी #GoEcoWithBappa असा हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

पर्यटन संचालनालयाचे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यू-ट्युबवर १.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. आपली संस्कृती, सण आणि परंपरा जगभर पसरवण्याबरोबरच निसर्गाशी मैत्री करण्याचा आणि त्याला कोणतीही हानी न पोहोचवण्याचा संदेश देण्याचे ध्येय आहे. त्यासाठी आम्ही आमचे सोशल मीडिया हॅण्डल वापरत आहोत, अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

विदेशी पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था
१. विदेशी पर्यटक आणि सेलिब्रिटींना गणेशविसर्जनाचा अनुभव देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन सोहळ्याचे जवळून दर्शन घेणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी पर्यटन विभागाने वातानुकूलित मंडप उभारला आहे. संध्याकाळी सहापासून दर्शन सुरू होईल.
२. परदेशी पर्यटकांना फेटा बांधून आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीची ओळख करून दिली जाणार आहे. दर्शन गॅलरीमुळे पर्यटक विसर्जनाच्या अनुभवाने मंत्रमुग्ध होतील.
३. जवळपासच्या चार आणि पाच तारांकित हॉटेलांशी संपर्क साधून त्यांना उपक्रमाला पाठिंबा देण्यास सांगण्यात येत आहे. जेणेकरून तिथे राहणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही विसर्जनाचा अनुभव घेता येईल. आतापर्यंत थायलंडमधील ६५ पर्यटकांनी असा अनुभव घेण्यासाठी नोंदणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08536 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..