फेरपरीक्षेत उत्तीर्णांना अकरावीत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेरपरीक्षेत उत्तीर्णांना अकरावीत प्रवेश
फेरपरीक्षेत उत्तीर्णांना अकरावीत प्रवेश

फेरपरीक्षेत उत्तीर्णांना अकरावीत प्रवेश

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लगेचच अकरावीच्या विविध शाखांसाठी प्रवेश मिळणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नाशिक आणि नागपूर या पाच महापालिका क्षेत्रांत हे प्रवेश अकरावीसाठी राबवण्यात येत असलेल्या दुसऱ्या विशेष फेरीदरम्यान केले जाणार आहेत; तर उर्वरित ठिकाणी हे प्रवेश संबंधित महाविद्यालयांत असलेल्या रिक्त जागांनुसार दिले जाणार असल्याची माहिती शनिवारी (ता. ३) शिक्षण संचालकाकडून देण्यात आली.
फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज भरण्याच्या सर्व प्रक्रिया आणि त्यासाठीची माहिती अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी २ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. या परीक्षेत मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतून ५ हजार ८०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुंबई विभागातील १ हजार ६३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी संपादन केलेल्या गुणवत्तेनुसार पसंतीच्या शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र यामध्ये मुंबई विभागात फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश हे त्यांच्या गुणवत्तेनुसारच दिले जाणार असून त्यासाठी राबवण्यात येत असलेल्या दुसऱ्या विशेष फेरीदरम्यान त्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी भाग-१ आणि भाग-२ यासाठी नोंदणी करता येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
...
जागा रिक्त असल्याने...
मुंबईमध्ये अकरावीच्या खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहतात. यंदाही राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता असल्याने दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकतील.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08539 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..