काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या नियुक्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या नियुक्त्या
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या नियुक्त्या

काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या नियुक्त्या

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या सरचिटणीस, सचिव आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या शनिवारी (ता. ३) जाहीर करण्यात आल्या. अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यामध्ये राज्यात ३६ नव्या अनुसूचित जाती विभागाच्या सरचिटणीसपदी तरुण आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिव म्हणून १७ जणांची नियुक्ती करण्यात आली, तर राज्य विभागाच्या या समितीत दोन सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली. नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले तज्ज्ञ आणि विविध विषयांतील अनुभवी व्यक्ती असून त्यांच्या नियुक्तीचा राज्यातील काँग्रेसच्या बळकटीकरणाला मोठा फायदा होईल, असा विश्वास काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष हत्तीअंबिरे यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08547 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..